एटीएम न्यूज नेटवर्क ः बेस्ट अॅग्रोलाइफ लि'. (बीएएल) ही भारतातील कृषी निविष्ठा उत्पादकांपैकी एक कंपनी असून, कंपनीला Pyroxasulfone 85% WG (पायरोक्सासल्फोन) आणि इतर तीन प्रमुख तांत्रिक उत्पादने बनविण्यासाठी नोंदणी मंजूर करण्यात आली आहे. केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती (सीआयबीआरसी) तर्फे बीएएलच्या उपकंपनीपैकी एक सीडलिंग्स इंडिया प्रा. लि.ला पायरोक्सासल्फोन 85% डब्ल्यूजीच्या उत्पादनास मंजुरी देण्यात आली.
"ही आमच्यासाठी महत्त्वपूर्ण प्रगती आहे. आमच्या अभिमानास्पद नावीन्यपूर्ण रॉनफेन व्यतिरिक्त आम्ही 2023 या आर्थिक वर्षात 9(3) आणि जेनेरिक उत्पादनांचे अनावरण केले. 2024 या आर्थिक वर्षासाठीही आमचा हाच हेतू आहे. या नवीन नोंदणीमुळे एआय आणि पायरोक्सासल्फोन असे दोन्ही प्रकारचे फॉर्म्युलेशन तयार करणारी बीएएल ही भारतातील पहिली आणि एकमेव कृषी रसायन कंपनी बनली आहे," असे बीएएलचे व्यवस्थापकीय संचालक विमल कुमार यांनी सांगितले.
"आमच्याकडे आधीपासूनच पायरोक्सासल्फोनच्या तांत्रिक उत्पादनासाठी नोंदणी आहे. या उत्पादनाचे या वर्षी ऑक्टोबरमध्ये अनावरण करणार आहोत. यासाठी आम्ही एका विशेष प्रक्रियेच्या पेटंटसाठी देखील अर्ज केला आहे. तो आम्हाला लवकरच प्राप्त होईल. हे उत्पादन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारपेठांसाठी तयार करण्याचा आमचा मानस असल्याने यापूर्वीच इतर देशांमध्ये नोंदणी अर्ज सादर केले आहेत," असेही विमल कुमार म्हणाले.
पायरोक्सासल्फोन हे गहू, मका आणि सोयाबीनसाठी तणनाशक आहे. हे उत्पादन या पिकांना धोका निर्माण करणाऱ्या तणांचे उच्चाटन करून उत्कृष्ट पीक सुरक्षितता प्रदान करताना अधिक उत्पादनाची खात्री देते. हे वनस्पतींना संश्लेषण करण्यापासून प्रतिबंधित करून कार्य करते. विशेषतः लाँग-चेन फॅटी ऍसिडस् हे रूंद पानांच्या तणांविरुद्ध अधिक प्रभावी आहे. गव्हातील प्राथमिक त्रासदायक तण फॅलारिस मायनर, पायरोक्सासल्फोन 85% WG द्वारे नियंत्रित केले जाते.
बीएएलला नुकतेच कलम 9 (3) एफआयएमअंतर्गत ट्रायफ्लोक्झिस्ट्रोबिन 10% + डिफेनोकोनाझोल 12.5% + सल्फर 3% एससी या संयोजन उत्पादनाच्या स्वदेशी उत्पादनासाठी नोंदणी प्राप्त झाली आहे. हे मिश्रण तांदूळ, टोमॅटो, द्राक्षे, मिरची, गहू, आंबा आणि सफरचंदावर होणाऱ्या शेथ ब्लाइट, पावडर मिल्ड्यू, स्कॅब आणि अल्टरनेरिया यांसारख्या रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण करते. बीएएल हे उत्पादन जुलैमध्ये ट्रायकलर या ब्रँड नावाने अनावरण करण्यासाठी सज्ज आहे.