एटीएम न्यूज नेटवर्क ः केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून 'वर्ल्ड फूड इंडिया-2023' ची दुसरी आवृत्ती 3-5 नोव्हेंबर 2023 दरम्यान प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जल शक्ती राज्यमंत्री, प्रल्हाद सिंग पटेल यांनी नुकतेच नॅशनल मीडिया सेंटर येथे 'वर्ल्ड फूड इंडिया-2023' साठी संकेतस्थळ, पुस्तिका आणि प्रचारात्मक व्हिडिओचे अनावरण केले.
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस म्हणाले, की भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. ज्यामध्ये गुंतवणुकीच्या अनेक संधी आहेत. विशेषत: अन्न प्रक्रिया क्षेत्रात. भारताला निर्यातीचे केंद्र बनविणाऱ्या श्री अण्णा-द सुपर फूड ऑफ इंडिया', इनोव्हेशन आणि सस्टेनेबिलिटी 'ग्रीन फूड', व्हाइट रिव्होल्यूशन 2.0, या 'वर्ल्ड फूड इंडिया-2023' या प्रमुख घटकांची रूपरेषा दिली.
श्री पारस म्हणाले, की तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान जगभरातील अन्न प्रक्रिया क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या त्यांचे सामर्थ्य दाखवतील अशी सरकारला अपेक्षा आहे. यासह व्यावसायिकांच्या बैठका, प्रदर्शने असतीलच शिवाय अन्नपदार्थांचा अनुभव घेण्यासाठी फूड स्ट्रीटचा विशेष विभाग तयार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम असंख्य संधी, उपलब्ध पायाभूत सुविधा, प्रोत्साहन आणि गुंतवणूकदारांना मिळणारे फायदे यावर प्रकाश टाकणार आहे.
प्रल्हाद सिंग पटेल म्हणाले, की 'वर्ल्ड फूड इंडिया-2023' च्या मागील आवृत्तीच्या अनुभवामुळे सरकार हा एक प्रमुख जागतिक कार्यक्रम म्हणून पाहत आहे. जगाच्या अन्नाच्या गरजा पूर्ण केल्याबद्दल भारताला अभिमान आहे. वैज्ञानिक मापदंडांमुळे अन्न प्रक्रिया उद्योगाच्या पुढील वाढीस मदत होईल. अन्न प्रक्रिया उद्योगातील पीएलआय योजनांसह विविध सरकारी उपक्रम विपणन आणि ब्रँडिंग वाढवत आहेत.
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सचिव अनिता प्रवीण म्हणाल्या, की वर्ल्ड फूड इंडिया-2023 हे खाद्य कंपन्यांच्या जागतिक गुंतवणूकदारांसाठी एक अनोखे व्यासपीठ आहे. अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योगांचे मोठे योगदान देऊन भारताला निर्यात केंद्र बनवण्याचे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. मूल्यवर्धन, प्रक्रिया यंत्रसामग्री, पॅकेजिंग तंत्रज्ञान आणि साहित्य इत्यादींवर मंत्रालयाचे लक्ष आहे.
मिलेट्स- 'श्री अण्णा-द सुपर फूड ऑफ इंडिया' हा या कार्यक्रमाचा एक आधारस्तंभ असून, त्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. प्राथमिक प्रक्रिया आणि साठवण, संरक्षण पायाभूत सुविधा, शीत साखळी, रेफ्रिजरेटेड वाहतूक आणि सेंद्रिय आणि पौष्टिक पदार्थांमध्ये मूल्यवर्धन यासारख्या कापणीनंतरच्या व्यवस्थापनातील संधी यावर भर दिला जाणार आहे.
(स्रोत ः पीआयबी)