वस्त्रोद्योगाचा पर्यावरणावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो आणि यामध्ये योगदान देणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे कापूस शेती होय. आज जगभरातील उत्पादनात भारतीय कापसाचा वाटा महत्त्वाचा आहे. ज्यामुळे हे क्षेत्र देशाच्या जीडीपी मध्ये सर्वोच्च योगदानकर्त्यांपैकी एक बनले आहे. परंतु दुसरी बाजू अशी आहे की कापूस पिकवण्याच्या पारंपारिक पद्धतींमुळे मातीची झीज, पाण्याची टंचाई आणि कीटकनाशक प्रदूषण यासह पर्यावरणावर परिणाम झाला आहे. आपण शेती थांबवू शकत नसलो तरी शेतीची कामे शाश्वत पद्धतीने करण्याचे अनेक मार्ग आहेत.
कौशल्य वाढवणे
जर आपण या क्षेत्रात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत शेती तंत्राने सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण वस्त्रोद्योगाला त्याचा फायदा होऊ शकतो. गेल्या दोन दशकांमध्ये कापूस शेतीमध्ये प्रगती झाली आहे. या शेतीतल्या प्रयोगांनी दाखवून दिले आहे की कापूस शेतीतील पाण्याची कार्यक्षमता ७५ टक्क्यांनी सुधारू शकते.
कापूस शेतीसाठी वेलस्पनचे उदाहरण
शाश्वत कापूस शेतीसाठी वेलस्पनचे उदाहरण महत्वाचे आहे. कापूस शेतीसाठी वेल- कृषी हा महत्वाचा उपक्रम आहे आणि यात सर्वांसाठी शाश्वत भविष्य निर्माण करण्याची बांधिलकी प्रतिबिंबित होते. आज वेलस्पनची शाश्वत शेती पद्धती देशभरात १.५ लाख एकर जमीनीवर होत असून १६,५०० हून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत.शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन,गट तयार करणे या माध्यमातून शेतकऱ्याला प्रक्षिशित केले जाते. प्रशिक्षणात मिळणारे ज्ञान आणि अनुभव शेतकरी एकमेकांना शेअर करू शकतात. याचा सकारात्मक परिणाम पर्यावरणावर तसेच शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झाला.
शाश्वत शेतीद्वारे सक्षमता
गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ, वेलस्पन द बेटर कॉटन इनिशिएटिव्ह (बीसीआय) चे अंमलबजावणी भागीदार आहे. त्यांच्याकडे एक सर्वसमावेशक दृष्टीकोन असून ज्यामध्ये पर्यावरण आणि सामाजिक समस्यांसह टिकाऊपणाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. जे शेतकरी बीसीआयशी संलग्न आहेत त्यांना प्रशिक्षण, साधने आणि तंत्रज्ञानाचा फायदा होऊ शकतो. यामुळे त्यांना शाश्वत पद्धतीने उच्च-गुणवत्तेचा कापूस उत्पादन करण्यात मदत होते.
शिवाय बीसीआय सोबत सहकार्य केल्याने खरेदीदार आणि पुरवठादारांचे एक विशाल नेटवर्क त्यांना मिळते. यामुळे बाजारपेठेतील संभावनांचा विस्तार करताना मध्यस्थांवर शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी होते. बीसीआय समर्थित खरेदीदारांना थेट विक्री करता येऊन यामुळे फायदेशीर किंमत शेतकऱ्यांना मिळते. त्यांच्या आर्थिक वाढीला चालना मिळते.
प्रगत तांत्रिक नवकल्पनांचा शोध
एमआयटीच्या सहकार्याने हायड्रोपोनिक्स पद्धतीने कापूस वाढवणे, कापड उद्योगाला लागणारे सर्वोत्तम कॉटन, मातीचे आरोग्य आणि सुपीकता सुनिश्चित करण्यासाठी पुनरुत्पादक शेतीसाठी वेलस्पनचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. वेलस्पनने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत शेतीच्या विविध पद्धती शिकवण्यासाठी शेती शाळाही तयार केल्या आहेत. तसेच कीटक व्यवस्थापनासाठी एआयचा वापर यासारखे नाविन्यपूर्ण उपाय शेतकऱ्यांसाठी कीटकनाशकांच्या खर्चात लक्षणीय बचत करू शकतात.
वेलस्पन इंडिया गेल्या वर्षभरापासून शेतीमध्ये एआयच्या वापराचा शोध घेत आहे. या तंत्रज्ञानाचा शाश्वत कापूस शेतीमध्ये पर्यावरणीय प्रभाव कमी करून, माती आणि पाण्याची गुणवत्ता सुधारून आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारून वस्त्रोद्योग क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे.