एटीएम न्यूज नेटवर्क : व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेड (व्हीएसटी) या शेती उपकरणाच्या उत्पादक कंपनीने ऍक्सिस बँकेसोबत (Axis Bank) सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि शेतीची यांत्रिकी उत्पादने खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज सुविधा मिळेल. करारानुसार ॲक्सिस बँकेच्या (व्हीएसटी) च्या संभाव्य ग्राहकांना त्यांच्या ५३७० शाखांच्या नेटवर्कद्वारे ही सुविधा मिळेल.
सामंजस्य करारानुसार दोन्ही कंपन्या शेतकरी समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतील. शेतीच्या यंत्रासाठी सहजपणे बँकेतर्फे कर्ज शेतकऱ्यांना मिळेल. शेती यांत्रिकीकरणाशी जुळवून घेण्यासाठी क्रेडिट सुविधेपर्यंत सहज प्रवेश मिळेल असे कंपनीने म्हटले आहे.
या भागीदारीमुळे शेतकऱ्यांना त्रासमुक्त, परवडणाऱ्या आणि लवचिक कर्ज सुविधांचा लाभ मिळेल असे कंपनीने म्हटले आहे.बँकेकडून लवचिक परतफेडीचे पर्याय, जलद मंजुरी आणि ईएमआय पर्यायांवर विशेष फायदे मिळतील. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती यांत्रिकीकरणाची निवड करण्यास प्रोत्साहित केले जाईल.
यावेळी व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेडचे सीईओ अँटोनी चेरुकारा म्हणाले, “व्हीएसटीमध्ये शेतीचा एकूण वेळ आणि खर्च कमी करून शेतीचे उत्पन्न सुधारून शेती सुलभ करण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो. सामंजस्य करारामुळे विशेषत: लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आमची उत्पादने खरेदी करण्यासाठी त्रासमुक्त कर्ज सुविधा मिळवून देण्यास मदत होईल.