एटीएम न्यूज नेटवर्क ः 2023 मध्ये भारतातून अमेरिकेला आंबा निर्यातीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. उत्तर अमेरिकेत असलेल्या 4.7 दशलक्ष अनिवासी भारतीय समुदायामुळे तिथे भारतीय आंब्याच्या विविध वाणांच्या मागणीत वाढ झाली आहे, असे तज्ज्ञ सांगतात. अनुकूल हवामान परिस्थिती आणि भारतातील आंब्याचा हंगाम लवकर सुरू झाल्याने या वर्षीच्या पिकाच्या मुबलकतेमध्ये आणि गुणवत्तेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अनुकूल परिस्थितीसह भारतीय आंबा उत्पादकांनी भरघोस पीक घेतले आहे. त्यामुळे अमेरिकेतील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा पुरवठा झाला. भारतीय आंबा उद्योगासाठी एक उल्लेखनीय बाब म्हणजे 2022 मध्ये झालेल्या निर्यातीच्या दुप्पट चालू हंगामात निर्यात होण्याचा अंदाज आहे.
के बी एक्सपोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौशल खाखर म्हणाले, की भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या प्रमाणात असलेल्या देशांपैकी त्यांनी इंग्लंडचे दुसरे उदाहरण दिले. युरोपमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांपैकी इंग्लंडमध्ये एकूण 70% भारतीय नागरिक राहतात. संपूर्ण तीन महिन्यांच्या हंगामात आंब्याचा पुरवठा करण्यासाठी इंग्लंडमध्ये किरकोळ विक्रेत्यांसोबत कार्यक्रम घेण्यात आले.
भारतीय आंब्याच्या मागणीत वाढ होत असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत आंब्याच्या निर्यातीचे प्रमाण दुप्पट म्हणजेच 2,000 टनांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. फेब्रुवारीपासून तापमान वाढलेले असतानाही उपलब्ध फळांचा दर्जाही उत्कृष्ट आहे. आंबा हंगाम मार्चमध्ये काही आठवडे लवकर सुरू झाला. हा हंगाम जूनच्या उत्तरार्धापर्यंत सुरू राहील अशी अपेक्षा आहे.
अमेरिकेत वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी गुजरातमध्ये चौथी किरणोत्सर्ग चिकित्सा सुविधा सुरू करण्यात आली. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील विद्यमान सुविधांमध्ये भर पडली आहे. आंबा पिकवणार्या प्रदेशांजवळ आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांजवळ असलेल्या या धोरणात्मक सुविधांमुळे उपचारानंतर फळांची जलद वाहतूक करणे शक्य होते,' असे ते म्हणाले.