एटीएम न्यूज नेटवर्क : सिजेंटा इंडियाने द्राक्ष आणि टोमॅटोसह अनेक पिकांसाठी "मिराव्हिस ड्युओ" आणि "रिफ्लेक्ट टॉप" ही दोन पीक संरक्षण उत्पादने सादर केली आहेत. सिंजेंटा इंडिया प्रा.लि.ही जगातील अग्रगण्य कृषी कंपन्यांपैकी एक आहे.ज्यामध्ये सिंजेंटा क्रॉप प्रोटेक्शनआणि सिंजेंटा सीड्स यांचा समावेश आहे.
मिराव्हिस ड्युओ हे अत्याधुनिक बुरशीनाशक आहे जे द्राक्ष, टोमॅटो, मिरची आणि शेंगदाणे पिकामध्ये वापरतात. हे पावडर मिल्ड्यू, अँथ्रॅकनोज आणि लीफ स्पॉट्स यांसारख्या रोगांवर नियंत्रण देते. त्यामुळे शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे उत्पादन मिळते.
जगभरातील शेतकरी दरवर्षी बुरशीजन्य रोगांमुळे त्यांची २३ टक्के पिके गमावतात. मिराव्हिस ड्युओ हे बुरशीनाशक पिकांना मजबूत आणि विश्वासार्ह रोग संरक्षण देते. त्यामुळे उत्पादकांना चांगल्या दर्जाचे उत्पन्न मिळून नफ्यात लक्षणीय वाढ होते.
दुसरे उत्पादन 'रिफ्लेक्ट टॉप', हे भारतातील मुख्य अन्न भातासाठी तयार केलेले एक विशेष बुरशीनाशक आहे. हे शीथ ब्लाइटपासून प्रभावी संरक्षण प्रदान करते. दीर्घकाळ रोग नियंत्रण करत असून पीक उत्पादनात वाढ करते.
सिजेंटा इंडियाचे कंट्री हेड आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील कुमार म्हणाले कि," सिजेंटा येथे आम्ही उत्पादकांच्या आव्हानांना प्रगत उपाय ऑफर करून शेतीचा कायापालट करण्यासाठी वचनबद्ध आहोत."
सिजेंटा इंडिया कृषी तंत्रज्ञानाच्या सीमा पुढे ढकलत आहे. शेतकऱ्यांना उत्पादकता वाढवण्यासाठी आणि संतुलित कृषी वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक साधनांसह सुसज्ज करत असल्याचे ते म्हणाले.
मिराव्हिस ड्युओ विषयी कुमार म्हणाले की, हे उत्पादन मिरची पिकांसाठी गेम चेंजर आहे. हे एक ब्रॉड-स्पेक्ट्रम सोल्यूशन आहे. जे पावडर बुरशी, लीफ स्पॉट्स आणि ऍन्थ्रॅकनोजसह अनेक प्रकारच्या रोगांपासून अनेक प्रकारच्या पिकांचे संरक्षण करते."
ते पुढे म्हणाले की 'हे उत्पादन सुरुवातीला भारतातील द्राक्ष, मिरची, टोमॅटो, शेंगदाणे आणि हे चार प्रमुख पिकांचे संरक्षण करेल. पण नंतर डझनभर अधिक कव्हर करण्यासाठी आणले जाईल.