एटीएम न्यूज नेटवर्क : पशुपालनाला चालना देण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा आमचा मानस आहे. राज्य सरकार नाविन्यपूर्ण योजना आणण्यासाठी आणि आगामी वार्षिक अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास तयार आहे कारण ग्रामीण अर्थव्यवस्थेत कृषी आणि दूध उत्पादनाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सांगितले. राज्यातील दूध उत्पादकांशी अशा प्रकारच्या पहिल्या संवादादरम्यान ते शिमल्यात बोलत होते.
यावेळी श्री.सुखू पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार शेतीला उद्योग म्हणून प्रोत्साहन देत आहे. "शेती आणि दुग्धोत्पादन यांचा थेट संबंध आहे आणि मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीकडे जाणे आवश्यक आहे. ज्यामुळे पारंपरिक शेतीतंत्रांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे आवश्यक आहे. पशुपालनाला चालना देण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा आमचा मानस असल्याचे ते म्हणाले.
दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर सहा रुपयांची नुकतीच झालेली वाढ हे दुग्धव्यवसाय क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी सरकारच्या पुढील वाटचालीचे द्योतक आहे. ते पुढे म्हणाले, “पैसा थेट शेतकऱ्यांपर्यंत जावा यासाठी धोरणे आणि नियमांमध्ये मूलभूत बदल केले जात आहेत.”
सरकार दूध उत्पादकांना करात सवलत देण्याचाही विचार करेल असे सांगून ते म्हणाले की, हिमालयीन प्रदेशातील दुधाची गुणवत्ता उत्तम आहे आणि त्याचे मार्केटिंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि रोजगार निर्माण होईल.राज्याच्या दुधावर आधारित अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी ५०० कोटींच्या अर्थसंकल्पीय तरतुदीसह ‘हिम गंगा योजना’ सुरू करण्यात आली होती, असे श्री. सखू म्हणाले.