एटीएम न्यूज नेटवर्क :
सहकारी निर्यात संस्था एनसीईएलला आतापर्यंत ७,००० कोटी रुपयांच्या निर्यात ऑर्डर मिळाल्या आहेत. १२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची एनसीईएलमध्ये नोंदणी झाली आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड सदस्य शेतकर्यांकडून निर्यात करण्याचा माल एमएसपीवर खरेदी करेल. एनसीईएलला निर्यातीतून मिळणाऱ्या एकूण नफ्यांपैकी सुमारे ५० % शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केले जाईल. हा नफा एमएसपीपेक्षा जास्त असेल असे ते म्हणाले.
श्री. शहा यांनी यावेळी एनसीईएलच्या पाच सदस्यांना सदस्यत्व प्रमाणपत्रांचे वाटप केले. यावेळी बोलताना केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले की, एनसीईएलची निर्मिती निर्यातीला चालना देऊन देशाच्या विकासात आणि ग्रामीण परिवर्तनाला हातभार लावेल.
या वर्षी २५ जानेवारी रोजी बहु-राज्य सहकारी संस्था कायद्यांतर्गत नोंदणीकृत झालेल्या एनसीईएलकडे दोन हजार कोटींचे अधिकृत भागभांडवल आहे आणि त्या सहकारी संस्था ज्या प्राथमिक स्तरापासून ते सर्वोच्च स्तरापर्यंत निर्यातीत स्वारस्य घेणार आहेत त्या संस्था सदस्य बनण्यास पात्र राहतील. देशात २९ कोटी सभासद असलेल्या सुमारे ८ लाख सहकारी संस्था आहेत.