भारतातील अॅग्रीटेक स्टार्टअप्स २०२५ पर्यंत २४ अब्ज डॉलर किमतीच्या बाजारपेठेची संधी पाहत आहेत. ऍग्रीटेक स्पेसच्या उदयाने भारत चौथ्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. आयओटी-सक्षम कृषी पद्धती, एआय-सक्षम मशीन आणि तंत्रज्ञान हे वाढणारे क्षेत्र आहे. भारत जागतिक कृषी उत्पादकतेत आघाडीवर आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या आकडेवारीनुसार भारत हा दूध, ताग आणि कडधान्यांचा सर्वात मोठा उत्पादक देश असून तांदूळ, गहू, ऊस, कापूस, शेंगदाणे आणि फळे आणि भाजीपाला यात दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
कृषीशास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखालील हरित क्रांतीने देशाच्या शेतीक्षेत्राला सुपरचार्ज केले.आज ऍग्रीटेक स्पेसच्या उदयाने भारत चौथ्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. देशाची अॅग्रीटेक इकोसिस्टम तयार होत आहे. जगातील सर्वात मोठ्या कृषी उद्योगांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रवेश वाढत असल्याने, भारतीय अॅग्रीटेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक आणि कमाई वाढत आहे. भारतात काही उल्लेखनीय अॅग्रीटेक स्टार्टअप्स आहेत. त्यांनी कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रगती केली आहे.
अॅग्रोस्टार हे स्टार्टअप्स २०१३ मध्ये शार्दुल शेठ आणि सितांशु शेठ यांनी स्थापन केले असून अॅग्रोस्टार शेतकऱ्यांना अॅप आणि संवादात्मक व्हॉइस रिस्पॉन्स आधारित कृषी उपाययोजना ऑफर करते. बिग हाट हे स्टार्टअप्स २०१५ मध्ये राज कंचम, सचिन नंदवाना आणि सतीश नुकाला यांनी स्थापन केले. बिग हाट हे शेतकरी केंद्रित डिजिटल मार्केटप्लेस आहे, जे शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि उच्च-गुणवत्तेच्या इनपुटच्या विस्तृत श्रेणीत प्रवेश देते.
क्रॉपइन हा अॅग्रीटेक प्लॅटफॉर्म आहे, जे फार्म-टू-फोर्क व्यवसायांना त्यांचे ऑपरेशन डिजिटलाइझ करण्यात आणि रीअल-टाइम डेटा आणि अंतर्दृष्टी प्रदान करून त्यांची निर्णय घेण्याची प्रक्रिया सुधारण्यास मदत करते. देहाट हे शशांककुमार यांनी २०१२ मध्ये स्थापन केले असून देहाट शेतकऱ्यांना उच्च-गुणवत्तेच्या कृषी निविष्ठांचे वितरण, सानुकूलित शेती सल्लागार, आर्थिक सेवांमध्ये प्रवेश आणि त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी बाजारपेठेतील संपर्क याची शेतकऱ्यांना कृषीसेवा देते.
एकी फूड्स हा स्टार्टअप्स २०१८ मध्ये आयआयटी बॉम्बेचे पदवीधर असलेले अभय सिंग आणि अमित कुमार यांनी स्थापन केले आहे. एकी फूड्सचे उद्दिष्ट आहे की वाढत्या चेंबर्सचा वापर करून शेती शाश्वत आणि बदलत्या हवामानावर आधारित सक्षम बनवणे हा आहे. हे चेंबर्स रोपांना वाढण्यासाठी आदर्श परिस्थिती प्रदान करतात. एर्गोस स्टार्टअप्स शेतकऱ्यांना त्यांच्या कापणीसाठी नऊ महिन्यांची स्टोरेज सेवा देते. याची स्थापना किशोर कुमार झा आणि प्रवीण कुमार यांनी २०१२ मध्ये स्थापन केले. यात प्लॅटफॉर्म संचयित धान्याच्या ७०% पर्यंत क्रेडिट प्रदान करते.
फार्ममार्ट हे मायक्रो सास-नेतृत्वाखालील अॅग्रीटेक प्लॅटफॉर्म म्हणून काम करते. जे मोठ्या खाद्य व्यवसायांना, कृषी-किरकोळ विक्रेत्यांच्या नेटवर्कचा वापर करून दर्जेदार उत्पादन मिळविण्यास मदत करते. याची स्थापना २०१६ मध्ये आलेख संघेरा आणि मेहताब सिंग हंस यांनी सुरू केले आहे. फसल हे एक अचूक फलोत्पादन व्यासपीठ म्हणून काम करते. हे स्त्रोत ऑप्टिमायझेशन (पाणी, कीटकनाशके इ.) सुलभ करते आणि उच्च-गुणवत्तेच्या, शोधण्यायोग्य उत्पादनांची खरेदी सुनिश्चित करते. यामुळे शेती उत्पादकता वाढते. याची स्थापना शैलेंद्र तिवारी आणि आनंदा वर्मा यांनी २०१८ मध्ये स्थापन केली.
ग्रामोफोन हे अॅग्रीटेक प्लॅटफॉर्म असून हे कच्च्या मालाच्या सोर्सिंगपासून वेअरहाउसिंगपर्यंतच्या क्रियाकलापांना सुलभ करते. याची स्थापना तौसीफ खान, निशांत वत्स आणि हर्षित गुप्ता यांनी २०१६ मध्ये केली आहे. इंटेलो लॅब्ज हे स्टार्टअप्स २०१६ मध्ये स्थापन केले असून मिलन शर्मा, निशांत मिश्रा हिमानी शाह आणि देवेंद्र चंदन यांनी सुरू केले आहे. गुरुग्राम-आधारित स्टार्टअप असून कृषी उत्पादनांची ग्रेडिंग आणि गुणवत्ता तपासणी करण्यासाठी ए आय आणि इमेज रेकग्निशन टूल्स वापरते.
किसान कनेक्ट हे विवेक निर्मल आणि निधी निर्मल यांनी २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात लाँच केले आहे. किसान कनेक्ट आता ५,००० शेतकऱ्यांचे नेटवर्क आहे. हे स्टार्टअप थेट या शेतकर्यांकडून त्यांच्या गावस्तरीय संकलन केंद्रांद्वारे अन्न मिळवते. निन्जाकार्ट हे बेंगळुरूस्थित स्टार्टअप असून शेतकऱ्यांकडून किराणा माल, फळे आणि भाजीपाला खरेदी करते आणि ते थेट सुपरमार्केट आणि इतर किरकोळ स्टोअरमध्ये वितरीत करते. २०१५ मध्ये नागराजन, शरथ लोगनाथन, सचिन जोस, कार्थेश्वरन केके आणि वासुदेवन चिन्नाथंबी यांनी स्थापन केलेल्या, निन्जाकार्टने २०हून अधिक राज्यांतील शेतकऱ्यांकडून दररोज १४०० टन ताज्या उत्पादनाचा स्त्रोत असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर ते १७,००० पेक्षा जास्त किरकोळ दुकानांना उत्पादनांचा पुरवठा करतात.
ओटिपी हा अॅग्रीटेक स्टार्टअप क्रोफार्म अॅग्रीप्रॉडक्ट्सचा एक भाग आहे. ओटिपी भाजीपाला, फळे, दुग्धव्यवसाय आणि इतर किराणा मालासह ताज्या उत्पादनांसाठी बी टू बी, बी टू सी. पद्धतीने सामाजिक वाणिज्य व्यासपीठ म्हणून काम करते. याची स्थापना वरुण खुराना आणि प्रशांत जैन यांनी केली आहे. व्हेग्रो हे बी टू बी. फळांचे मार्केटप्लेस चालवते. २०२० मध्ये प्रणित कुमार, मृदुकर बच्चू, किरण नाईक आणि शोभित जैन यांनी स्थापन केले आहे. हे शेतकर्यांना पीक सल्लागार, ग्रेडिंग, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि विक्री समर्थन यासारख्या तांत्रिक उपायांची श्रेणी देते. वेकूल हे एक पूर्ण-स्टॅक अॅग्रीटेक प्लॅटफॉर्म चालवते. जे किरकोळ विक्रेते, व्यापारी आणि प्रक्रिया उत्पादक यांना उत्पादन विकू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना जोडते. याची स्थापना २०१५ मध्ये कार्तिक जयरामन आणि संजय दासारी यांनी केली आहे.