एटीएम न्यूज नेटवर्क ः भारतातील काही शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) निर्यातदारांनी पुढाकार घेत संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये फळे पाठवण्यास सुरुवात केली आहे. दुबईत इराणहून येणाऱ्या टरबूजांपेक्षा भारतीय टरबूज अधिक भाव खात आहेत.
आम्ही काळ्या टरबूजाचे दोन कंटेनर दुबईला चाचणी तत्त्वावर निर्यात केले. तिथल्या बाजारात चांगला भाव मिळाला. भारतातील एफपीओ आखाती देशांमध्ये दुप्पट किंमत मिळवत आहेत, अशी माहिती मुंबई येथील मुबाला अॅग्रो कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मुकेश सिंग यांनी दिली.
भारतीय टरबूजाचा आकार लहान असतो. त्याचे वजन ३ ते ५ किलो असते. अशा प्रकारे 10 किलोपर्यंत वजन असलेल्या इराणी टरबूजांपेक्षा भारतीय टरबूज अधिक सोयीस्कर होतात. ते बहुधा वापरासाठी मोठ्या प्रमाणात चांगले आहे. आंतरराष्ट्रीय किरकोळ विक्रेते भारतीय टरबूज घेण्यास तयार आहेत. इराणी टरबूजांपेक्षा अधिक किंमत देण्यास तयार आहेत, असे मुबाला सिंग म्हणाले.
निर्यातदार एफपीओकडून कमिशनच्या आधारे टरबूज मिळवत आहेत. आम्ही यासाठी तुटपुंजे कमिशन घेतो. एकदा का तुम्ही टरबूज दुबईत उतरवल्यावर तुमचे नुकसान होणार नाही याची खात्री बाळगा. जर तुम्ही कॅरेफोर सारख्या आंतरराष्ट्रीय किरकोळ विक्रेत्यांना थेट विक्री करू शकत असाल, तर तुमचे मार्जिन अधिक वाढू शकते, असे सिंग म्हणाले.
सुपर स्टोअरमध्ये भारतीय टरबूज 4 यूएई दिरहम (रु. 89.25) पेक्षा जास्त आहे. तर इराणी टरबूज ज्यांची आतापर्यंत मक्तेदारी होती, त्यांची किंमत किरकोळ दुकानांमध्ये सुमारे 3 दिरहम (रु. 67) आहे. घाऊक बाजारात भारतीय फळांना किमान १.७ दिरहम (रु. ३८) मिळतात.
आयजी इंटरनॅशनलच्या सिंगल फॅमिली कार्यालयाचे संचालक तरुण अरोरा म्हणाले, भारतीय टरबूज त्यांचा दर्जा आणि चवीमुळे दुबईच्या बाजारात सर्वाधिक भाव खात आहेत. आमचे टरबूज त्यांच्या गोडपणा, रसाळपणा आणि उत्कृष्ट पोत यासाठी ओळखले जातात.
कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) चे मावळते अध्यक्ष अंगमुथू म्हणाले, आयजी इंटरनॅशनल या आणखी एका कंपनीने स्वसंघर्ष सेंद्रिय शेतकरी उत्पादक संस्थेद्वारे उत्पादित टरबूज निर्यात करण्यासाठी पुढाकार घेतला. कंपनीने 25 टन विनाबियांचे टरबूज दुबईला निर्यात केेले. निर्यात केलेल्या टरबूजांची ती पहिली खेप होती. संबंधित एफपीओला 10 रुपये प्रति किलो असा दर मिळाला. देशांतर्गत बाजारात मिळणाऱ्या दरापेक्षा हा जवळपास दुप्पट दर आहे.
अंगमुथू म्हणाले की, आयजी इंटरनॅशनलने ५० एकर जमिनीवर टरबूज लागवडीसाठी स्वसंघर्षसोबत करार केला आहे. टरबूजांच्या नवीन जाती विकसित करण्यासाठी ते एफपीओला सर्व सहकार्य करत आहे. अशा प्रयत्नांमुळे फलोत्पादनाच्या निर्यातीच्या यादीत टरबूज एक संभाव्य फळ म्हणून येण्याची शक्यता आहे.