एटीएम न्यूज नेटवर्क ः उन्हाळा सुरू होताच आंब्याचा हंगाम सुरू होतो. महाराष्ट्रात आंब्याच्या विविध जातींचे उत्पादन होते. परंतु हापूस आंब्याला अधिक मागणी असते. अवकाळी पावसामुळे कृषिमालाला फटका बसला असला तरी वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत निर्यातीसाठी हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. फळाची गुणवत्ता, गोडी आणि निर्यातक्षम असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर हापूस आंब्याला चांगली मागणी असते.
त्याच पार्श्वभूमीवर कोकण विभागातील हापूस आंब्याचा नियमित पुरवठा मुंबईच्या बाजारपेठेत होत असून, वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) घाऊक यार्डात दररोज १०,००० ते १२,००० क्रेटची आवक होत आहे. तसेच विविध देशात निर्यात आधीच सुरू झाली आहे. या आशयाचे वृत्त अपेडाने टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे.
आखाती देश, सिंगापूर आणि ब्रिटन या ती आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये भारतीय हापूस आंब्याची निर्यात सुरू झाली आहे. मुंबईच्या बाजारपेठेत दररोज होणाऱ्या एकूण आवकपैकी सुमारे ३०% आता निर्यात होत आहेत. साधारणत: मार्चच्या मध्यात कोकणी आंबा मुंबईच्या बाजारपेठेत दाखल होतो, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. हे प्रमाण या महिन्याच्या अखेरीस 30 हजार क्रेट आणि नंतर एप्रिलमध्ये 40 हजार क्रेटवर जाईल. एका क्रेटमध्ये ४ ते ६ डझन आंबे असतात. प्रत्यक्षात गतवर्षीच्या याच कालावधीपेक्षा यंदाचा पुरवठा अधिक आहे.
सिंधुदुर्गातील हापूस आंब्यांचा पुरवठा बाजारपेठेत वरचढ आहे. बाजार समितीत हापूसच्या एका क्रेटमागे 1,500 ते 4,000 रुपयांदरम्यान किमती घसरल्या आहेत. एका क्रेटसाठी किरकोळ विक्री 2,500 ते 6,000 रुपये होत आहे. पुरवठ्याचे प्रमाण वाढल्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता बाजार निरीक्षकांनी व्यक्त केली आहे.
एपीएमसीमध्ये दररोज येणाऱ्या विविध जातींच्या आंब्यांच्या एकूण 40,000 क्रेटपैकी 30% हापूस जातीचे आहेत. इतकेच नव्हे, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या दक्षिण भारतीय राज्यांमधून हापूस आंब्याच्या 5,000 पेटी मुंबईत आल्या आहेत. गेल्या वर्षी याच वेळी मुंबईत एकूण 10,000 ते 15,000 क्रेट म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास तिप्पट पुरवठा झाला होता. मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्यामुळे किमतीत घट झाली आहे.
(स्रोत ः अपेडा)