एटीएम न्यूज नेटवर्क ः कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या अग्रगण्य भारतीय कृषी द्रावण पुरवठादार कंपनीनेने आयआयटी मुंबई येथील संशोधन व विकास केंद्राने विकसित केलेल्या 'नॅनो डीएपी' या अत्याधुनिक नॅनो तंत्रज्ञानावर आधारित खताचे अनावरण करण्याची घोषणा केली.
कोरोमंडलकडून उत्पादनाची परिणामकारकता प्रस्थापित करण्यासाठी आघाडीच्या कृषी विद्यापीठांशी भागीदारी करून 700 प्रादेशिक चाचण्या घेण्यात आल्या, असे कंपनीने एका पत्रकात म्हटले आहे.
मार्चच्या सुरुवातीला नॅनो डीएपीला खते विभागाकडून नियामक मंजुरी मिळाली. फॉस्फेट खतामध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास कोरोमंडलने पुढाकार घेतला.
आंध्र प्रदेशमध्ये कंपनी 4 कोटी बाटल्या तयार करण्याची क्षमता असलेली नॅनो डीएपी उत्पादन सुविधा उभारत असून, ती 2023 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनी एक एकर शेतीच्या पोषक गरजा पूर्ण करू शकणारे उत्पादन 1 लिटरच्या बाटलीमध्ये उपलब्ध करून देणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रसायने आणि खते मंत्रालयाचे सचिव अरुण बरोका म्हणाले, “नॅनो डीएपी हे खतांमध्ये आत्मनिर्भार दृष्टीकोण साध्य करण्याच्या दिशेने भारताचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आम्ही नॅनो डीएपीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पारंपरिक पोषक घटकांना पर्यायी खत म्हणून स्थान देण्यासाठी उद्योगांच्या जवळून काम करत आहोत.”
याप्रसंगी, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष अरुण अलगप्पन म्हणाले, “शेतीचे अर्थशास्त्र सुधारण्यावर त्याचा परिणाम होण्याबरोबरच नॅनो डीएपी खतांमध्ये स्वावलंबनाला चालना देऊ शकते आणि 'मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड'ला भेटण्याची संधी प्रदान करते."