एटीएम न्यूज नेटवर्क ः शेतमालाचे एकत्रीकरण करणाऱ्या म्हणून शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) उदयास येत असून, कृषी आणि प्रक्रिया अन्न निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) ने या संस्थांना थेट निर्यात करण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या क्षमता वाढीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.
एफपीओंचे सकारात्मक योगदान असून त्यांना चांहला पाठिंबा मिळत असल्यामुळे कृषी आणि अन्न निर्यातीत सकारात्मक गती मिळाली आहे. त्यामध्ये त्यांची प्रगतीही आहे. एफपीओं हे थेट उगमस्थान केंद्र आणि समूह म्हणून काम करत आहेत. तसेच, निर्यातदारांना थेट एफपीओ आणि एफसीपींमधून स्रोत मिळवणे सोपे वाटत आहे. त्यांच्यासाठी क्षमता वाढवण्याचे तसेच थेट निर्यात करण्यासाठी मदत करण्याचे काम अपेडा करत आहे, असे अपेडाचे अध्यक्ष एम. अंगमुथू यांनी सांगितले.
अलीकडच्या काळात विविध राज्यांमध्ये हजारो एफपीओ/एफसीपी निर्माण करण्यात आल्या आहेत. 2024 पर्यंत 10,000 एफपीओ निर्माण करण्याची सरकारची योजना आहे. या वर्षी 31 मार्चपर्यंत 1000 हून अधिक एफपीओना थेट निर्यातदार होण्यासाठी प्रशिक्षित करण्याचे आमचे लक्ष्य आहे. आरसीएमसी (नोंदणीसह सदस्यत्व प्रमाणपत्र) आयईसी (इम्पोर्टर-एक्सपोर्टर कोड) दस्तऐवजांसह जारी केले जाईल. जेणेकरून ते थेट निर्यात करू शकतील, असे अंगमुथू म्हणाले.
आतापर्यंत, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये सुमारे ७०१ एफपीओ/एफपीसीना अपेडाकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारतातून कृषी आणि अन्न उत्पादनांच्या निर्यातीच्या मागणीत वाढ होण्यात एफपीओ/एफसीपींचे योगदान दिसून येते. प्रशिक्षित एफपीओ भरड धान्ये, बागायती उत्पादने आणि भौगोलिक संकेत उत्पादनांची निर्यात करतील, असे अंगमुथू यांनी सांगितले.
2025 पर्यंत 100 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचे लक्ष्य साध्य करण्यासाठी भरडधान्ये आणि त्यांच्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अपेडाने एक बळकट धोरण तयार केले आहे. भरडधान्ये निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून, अपेडाने भारताच्या संभाव्यतेचे मूल्यांकन करणारी एक व्यापक जागतिक विपणन मोहीमदेखील जारी केली आहे. त्यानुसार ई -कॅटलॉग 30 आयातदार देश आणि 21 बाजरी उत्पादक राज्यांची यादी केली आहे.
भारत 200 हून अधिक देशांमध्ये कृषी उत्पादने निर्यात करतो. सध्या कृषी उत्पादनांचा आठवा सर्वात मोठा निर्यातदार आहे. अपेडाद्वारे देखरेख केलेल्या कृषी उत्पादनांची निर्यात या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 16 टक्क्यांनी वाढून 17.435 अब्ज डॉलर्स झाली आहे. मागील वर्षी निर्यातीचा आकडा 15.072 अब्ज डॉलर्स होता. 2021-22 मध्ये अपेडाची निर्यात 24.74 अब्ज डॉलर्स होती.