एटीएम न्युज नेटवर्क : नाशिक अॅग्रो डीलर्स असोसिएशन नाशिक दि. २२/०७/२०२३ शनिवार रोजी नाडाच्या कार्यालयात युरिया व खते लिकिंग तसेच खरीप हंगाम २०२३ बियाणे शिल्लक साठा बाबत चर्चा करण्यासाठी सर्व नाडा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व विक्रेते याची मिटींग झाली. यामध्ये रासायनिक खते कंपन्या याच्या सर्व रासायनिक खताना युरिया लिंक करून दिला जातो, याचे प्रमाण १-१ म्हणजेच एक युरिया गोणी सोबत एक इतर खताची गोणी दिली जाते.
ईगतपुरी, नंबकेश्वर, सुरगाणा, पेठ तालुक्या मध्ये भात शेती मोठया प्रमाणात असल्याने सर्व भाग आदिवासी ग्रामीण आहे बागायती क्षेत्र कमी असल्याने शेतकऱ्याची फक्त युरियाला मागणी असते युरिया सोबत रासायनिक खत विकल्यास कृषी निविष्ठा विक्रेता शेतकऱ्यांच्या नजरेत दोषी ठरतो. या प्रकारात खते उत्पादक कंपनीस दोषी धरत नाही, सर्व दोष वितरकांवर येतो. युरिया खतावर व लिकिंगचा प्रॉब्लेम दरवर्षी येत असतो त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा खते लिकिंगमध्ये काही कंपन्या मिश्र खते तर काही कंपन्या विद्राव्य खते लिंकिंग करता. एखादी युरियाची गाडी मटेरियल किंमत साधारणतः ५३००० रुपये होते तर लिंकिंग मटेरियल साधारणतः ३ ते ५ लाख रुपया सोबत मिळते.
युरियाची कंपनी खरेदी - वाहतूक भाडे + हमाली असा खरेदी खर्च काढला तर युरियाची खरेदी MRP च्या वर जाते शेतकरी वर्ग फक्त युरिया खरेदी करतात बाकीचे मटेरियल म्हणजे खते, विद्राव्य खते कृषी निविष्ठा विक्रेत्याकडे दुकानात तसेच शिल्लक राहते पर्यायी लिकिंगमुळे कृषी निविष्ठा विक्रत्याचे भांडवल अडकते. सदर लिकिंग पद्धत युरिया बाबत सर्वत्र दिसून येते वरील सर्व गोष्टीचा कृषी विभागाने आपल्या स्तरावर उचित विचार करून योग्य ती कार्यवाही व्हावी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्याना न्याय मिळावा अन्यथा कृषी निविष्ठा विक्रेते युरिया खरेदी विक्री बंद करण्याच्या विचारात आहे.
या मिटींगसाठी नाशिक अॅग्रो डिलर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष विजयनाना पाटील, उपाध्यक्ष अरुण मुळाणे, लक्ष्मीकांत जगताप, मंगेश तांबट, चंद्रकांत ठक्कर, सुनिल पाटील, कृष्णा पगार, रामचंद्र आहेर, पोपटराव धनवटे, काकासाहेब भालेराव, बाळासाहेब जाधव, रामभाऊ जाधव, संजय हिरावत, महेंद्र बोरा, विनोद खिवंसरा, संतोष पाटील, नितीन काबरा तसेच सर्व तालुक्याचे अॅग्रो डिलर्सचे अध्यक्ष व पदाधिकारी व नाडाचे पदाधिकारी उपस्थित होते.